79 Independence Day
Gallery > 79 Independence Day

हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे
विविधतेतील एकता ही आपली शान आहे.
म्हणून माझा प्राणप्रिय भारत महान देश आहे.
जयहिंद जवान जय जवान जय किसान
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
स्वातंत्र्याचे हे पर्व आदर्श शैक्षणिक समूह अंतर्गत मातोश्री कमलबाई विसपुते वर्किंग वुमन (सखी निवास) वसतिगृहामध्ये आनंदाने ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. ध्वजा रोहणासाठी रिटायर्ड कॅप्टन मा. श्री. जयलाल मान साहेब या मान्यवरांच्या शुभहस्ते सकाळी ठिक ७.३० वाजता ध्वजारोहण करण्यात आले. आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन तसेच भारतीय जनता पार्टी पदवीधर प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक मा. श्री धनराजजी विसपुते संचालिका अध्यक्षा मा. सौ. संगीता विसपुते मॅडम वसतिगृह रेक्टर सौ. कांचन देशमुख सर्व विभागाचे प्राचार्य कर्मचारी वर्ग व वसतिगृह विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात साजरा केला.